*इंडियन मेडिकल असोशियेशन च्या वतीने डॉ राजेश नवांगुळ यांची तालुका कोव्हिड लसीकरण टास्क फोर्स सदस्य पदी निवड

*तर रोटरी क्लब तर्फे डॉ महेश जोशी यांची निवड*

*💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यासाठी कोव्हींड लसीकरण टास्क फोर्सचे सदस्य म्हणून रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने डॉ. महेश जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर रोटरी अध्यक्ष डॉ. राजेश नावागुळ यांची इंडियन मेडिकल ऑफिसर असोशियेशन च्या वतीने निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल या दोघांचे ही रोटरी क्लबच्या सभेत अभिनंदन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ही सामाजिक संस्था नेहमीच समाजासाठी कार्य करते आणि पोलिओ लसीकरणाचा मोठा अनुभव रोटरी क्लबला आहे. त्यामुळे रोटरी क्लबच्या सदस्यांवर असलेली जबाबदारी हा रोटरी क्लबचा सन्मान आहे. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष महेश जोशी आणि आजी अध्यक्ष राजेश नवागुळ हे दोघेही आपले काम प्रभावीपणे करतील आणि वेगळी छाप निर्माण करतील असा विश्वास रोटरीचे ज्येष्ठ सदस्य अनंत उचगावकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. यावेळी सचिव दिलीप म्हापसेकर, प्रमोद भागवत, वसंत करंदीकर, सत्यजित धारणकर, प्रकाश मसुरकर, संतोष सावंत, नागेश कदम, सुनील सावंत, प्रवीण परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page