*💫कणकवली दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.नारायण महाराज भिवा परबकाळसेकर रा.वेतळबाबर्डे कुडाळ यांचे वृद्धापकाळाने दुःखद काल रात्री ८वाजता निधन झाले. वारकरी संप्रदायात ते काळसेकर महाराज म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ४७ वर्षे पंढरपूर माघावारी व ५ वर्षे पंढरपूर आषाढि वारी पायी केली.ते वेतळबाबर्डे दिंडी चे प्रमुख होते. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने त्यांना संप्रदायातील मानाचा संतसेवा* पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व दोन मुली असा परिवार आहे .त्याच्या अंत्ययात्रेस मोठया संख्येने वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.नारायण महाराज परब(काळसेकर) यांचे दुःखद निधन….
