*💫कणकवली दि.११-:* महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी शहरातील शिवसैनिक प्रमोद मसुरकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत व संघटनेचे सेक्रेटरी राजेश महाडिक यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. माथाडी जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष आप्पाभाई पराडकर यांनी हे नियुक्ती पत्र नुकतेच देत प्रमोद मसुरकर यांचे अभिनंदन केले आहे.यावेळी हिंद भारतीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेट्ये उपस्थित होते.
माथाडी जनरल कामगार सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद मसुरकर
