मनसे तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा महसूल विभागास सवाल
*💫सावंतवाडी दि.११-:* तालुक्यात बिनशेती न करता ज्यांनी घर बांधली अशा घरांवर बिनशेती करण्यासाठी सावंतवाडी महसूल कडून कारवाई सुरू झालेली आहे. गावामध्ये अनेक ठिकाणी तलाठी, मंडळ अधिकारी घरांची मोजमापे घेऊन त्यांना नोटिसा बजावत आहेत. मागचे सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि आताचे सत्ताधारी महाविकास आघाडी यांनी निवडणुका आल्या की ढोल पेटवायला सुरुवात केली की, घर बांधण्याचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे देणार परंतु, महाविकास आघाडी ला एक वर्ष झाले तरी घर बांधण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला अजुन दिले नाही आहेत. तसे शासनाचे परिपत्रक देखील नाही. शासनाचे अटी शर्ती पाहिले तर सर्वसामान्य गरिब घर बांधू शकत नाही. बिनशेती करायला गेलो तर काही ठिकाणी लोकांच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी 23 नंबर चा ग्रामपंचायतचा रस्ता नाही आहे. त्याच प्रमाणे गाव तुकडेबंदी असल्यामुळे तेही शक्य नाही आहे. तरी महसूल विभागामार्फत जो अनधिकृत बांधकामांना घरकुलांना नोटिसा बजावण्याचे व दंड आकारण्याचे काम चालू आहे तसेच वाळूचा अधिकृत लिलाव होत नाही. सध्या कोव्हिड मुळे जनता हैराण असताना, तुम्ही दंड कसले आकारता असा सवाल मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी उपस्थित केला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्रास दिलात तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा देखील त्यानी महसूल विभागाला दिला आहे. जर सावंतवाडी तालुक्यात अवैद्य वाळू, खडी, गौण खनिज यांच्या विरोधात तक्रार देऊनही जर महसूल यंत्रणा कारवाई करत नसेल तर महसूल विभागाने बजावलेल्या सर्व नोटिसाचा दंड आकारण्यात आलेला आहे असा दंड कोणीही भरू नये जर तगादा लावण्यात आला तर मनसेशी संपर्क करा आम्ही तुमच्या पाठीशी राहू असे आव्हान तालुकाअध्यक्ष तथा निगुडे गावचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केले आहे