नगराध्यक्ष समीर नलावडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…
*💫कणकवली दि.११-:* कणकवली नगरपंचायत सर्वसाधारण व विषेश सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन घेण्यात येतात. त्यामुळे सभेतील विषयाबाबत नेटवर्कमधील दोषामुळे एखादया विषयावर विस्तृत चर्चा करणे सदस्यांना शक्य होत नाही. कणकवली नगरपंचायत सभागृहात सदस्यांना सामाजिक अंतर राखून सभा कामकाजास उपस्थित राहण्यास पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे यापुढील सभा या पुर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने नगरपंचायत सभागृहात घेण्यास परवानगी मिळावी अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या सभेमध्ये कोव्हिड – १९ नियमांचे पालन करण्याची नगरपंचायतीकडून दक्षता घेण्यात येईल असेह नलावडे यांनी या अर्जात म्हटले आहे.