वैभववाडीत तालुक्यात नव्याने 12 कोरोना पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील अन्य 3 पॉझिटिव्ह

*💫वैभववाडी दि.११-:* वैभववाडी तालुक्यात नव्याने 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.शुक्रवारी 3 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील व्यक्ती आढळल्या आहेत.सर्व रुग्णांची प्रकृती बरी आहे. 2 पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्हा रुग्णांलय ओरोस येथे उपचार सुरू आहेत.तर अन्य 10 रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. हेत व गडमठ येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. वैभववाडी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होतांना दिसत आहे. गेले नऊ महिन्यात वैभववाडी तालुक्यात 163 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.आता पर्यंत वैभववाडी तालुक्यात 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मृत्यू झालेले आहेत.तर 150 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह बरे होऊन घरी गेले आहेत.या पुढे लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.तरी लोकांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page