
फ्रिजच्या शॉटसर्किटमुळे फ्लॅट ला लागली आग
*न्यू खासकीलवाडा येथील घटना* *ð«सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी न्यू खासकिलवाडा येथील घोगळे रेसिडेन्सी मध्ये एका फ्लॅट ला फ्रिज च्या शॉटसर्किट मुळे आग लागली असून, वेळीच अग्निशमन दलाचा बंब उपलब्ध झाल्याने ही आग विझवण्यात यश आले आहे. मात्र या आगीत फ्रिज पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.