महाराष्ट्र समविचारी मंचाची मुख्यमंत्र्यासह संबंधितांकडे मागणी;पाठपुरावा करण्यासाठी संपर्क साधण्याचे समविचारी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास आजगावकर यांचे आवाहन
*💫मालवण दि.१०-:* राज्यातील आरोग्य विभागात सुमारे ५० टक्क्यांहून अधिक विविध सवर्गांची पदे रिक्त आहेत. शासनाने कोरोना महामारीच्या काळात कमी कालावधीसाठी परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार, विविध तंत्रज्ञ नेमले आणि काम संपताच कमी केले. मुळात रिक्तपदांच्या परिणामी आरोग्य व्यवस्था कोलमडलेली असताना अशा कर्मचाऱ्यांना गरजेनुसार वापरून कमी करणे हा कृतघ्नपणा आहे. कोरोनाच्या भीतीने कर्मचारी येण्यास धजावत नसताना या कर्मचाऱ्यांनी दिलेली माणूसकी, सेवाभाव यांचा विचार करता, या सर्वांना शासनाने कायमस्वरुपी सेवेत घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचाने मुख्यमंत्र्यांसह संबंधितांकडे केली आहे. याप्रश्नी पाठपुरावा करण्यासाठी शासकीय, निमशासकीय खासगी आस्थापनेत ज्यांनी-ज्यांनी याकामी सहभाग घेतला, अशांनी आपले नाव, पत्ता, फोन नंबरसह (९५५२३४०३४०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समविचारीचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभूदास आजगावकर यांनी केले आहे.