परजिल्ह्यातील शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत संघटना आपल्या भुमिकेशी ठाम
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* रविवारी सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून शिक्षकांना त्यांच्या परजिल्ह्यात गावी जाता येणार नाही, अशा आशयाचा आदेश नुकताच सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी काढला असून या आदेशाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने तीव्र आक्षेप घेतला असून शिक्षकांना वेठीस धरला जाणारा सदर निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा अध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली जि.प. कार्यालय ओरोस येथे गुरूवारी धरणे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलन स्थळी प्रारंभी सिंधुदुर्ग जि.पचे माजी अध्यक्ष यांचे चिरंजीव देवेद्र पडते यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी संजय वेतुरेकर उपस्थित शिक्षकांना संबोधन करताना म्हणाले की परजिल्ह्यामध्ये जाणार्या शिक्षकांमुळे कोरोना विषाणूचा धोका निर्माण होऊ शकतो, असे शिक्षणाधिकारी यांनी एका पत्राद्वारे मुख्याध्यापक आणि संस्थांना कळविले आहे. शाळेसंदर्भात शासनाची भूमिका लवचिक असताना फक्त शिक्षकांवर अन्याय का? असा सवाल वेतुरेकर यांनी करीत ते पुढे म्हणाले की बर्याच विद्यार्थ्यांचे पालक डॉक्टर, व्यापारी, व्यावसायिक, ड्रायव्हर आहेत, तेही जिल्ह्याबाहेर नियमित ये-जा करतात. असे असताना केवळ शिक्षकांना लक्ष्य करणे योग्य वाटत नाही. या निर्णयामुळे शाळेतील कोणत्याही कर्मचार्यावर आपल्या कौटुंबिक कारणासाठी किंवा इतर गरजेच्या कारणासाठी शासनाचा जिल्हाबंदीचा आदेश नसताना केवळ सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने गेली आठ महिने त्रस्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना जिल्हा बंदी करणे म्हणजे मानसिक त्रास देण्याचा प्रकार आहे, म्हणून सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांचा हा चुकीचा निर्णय शाळेतील कर्मचार्यांना नाहक त्रासदायक ठरत आहे. हा निर्णय त्वरीत रद्द व्हावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान आंदोलन स्थळी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावतीने उपशिक्षणाधिकारी सुनिल मंद्रूपकर,अधिक्षक विठ्ठल इंफाळ यांनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण जोपर्यंत सदर निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सूरूच राहणार अशी संघटनेशी भुमिका घेतल्याने उपशिक्षणाधिकारी मंद्रुपकर यांनी आपली भुमिका वरिष्ठांकडे पाठवण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तसेच सिंधुदुर्ग जिपचे माजी अध्यक्ष रणजित देसाई आणि शिक्षण सभापती सौ.सावी लोके यांनी भेट देऊन आपला प्रश्न जिपच्या सर्वसाधारण सभेत घेऊन मार्गी लावण्याचे आश्वाशित केले. या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर,सचिव सूरेश चौकेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,संघटक समीर परब, उपाध्यक्ष डी.एस पाटील,अनंत सावंत,संजय नाईक,दिपक तारी, जनार्दन शेळके,राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण, तसेच हेमंत सावंत,अनिल लोके,संजय सामंत,संजय जाधव,शरद देसाई, अविनाश कांबळे,माणिक पवार, राजाराम पवार,यांच्यासह अन्य जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आंदोलन स्थळी भेट देऊन प्रश्र्न मार्गी लावण्याचे आश्वाशित केल्याबद्दल सचिव सूरेश चौकेकर यांनी संघटनेच्यावतीने आभार मानले आहे.