मालवण दि प्रतिनिधी नाताळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूमच्या हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन आणि विक्री केंद्राचे उद्घाटन मालवण येथे करण्यात आले. शहरातील मेन रोड, मेढा येथील दैवज्ञ भवनात हे प्रदर्शन १६ डिसेंबरपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन गणेश प्रबुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाला मालवणवासियांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक पांडुरंग पोतन यांनी दिली. तसेच ख्रिस्मस नाताळ सणानिमित्त विक्रीवर खास २० टक्के सूट ठेवण्यात आली आहे. हातमाग व यंत्रमागापासून बनवण्यात आलेल्या विविध प्रकाराच्या खादी, मधुराई सिल्क, सेमी पैठणी, पटोला, धारवाड कॉटन, उबली कॉटन, मधुराई कॉ टन, ईरकल कॉटन, बेगलो सिल्क आदी साड्या तसेच पटोला, ईश्कल, प्रिन्ट ड्रेस मटेरियल, सोलापूर चादर, बेडशिट, नॅपकीन, सतरंजी, पंचा, शर्ट, कुर्ती, लेडीज हॅन्डबॅग, लेगीन्स, गाऊन, परकर, वॉलपिस असे विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. असेही पोतन यांनी सांगितले.
सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलुमच्या हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे मालवणात उद्घाटन
