*💫मालवण दि.१०-:* मालवण मधील दांडी आवार येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश महाबळेश्वर मेस्त (वय ६३) यांचे गुरूवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली काही वर्षे त्यांनी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करत मच्छीमारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. मच्छीमारांच्या चळवळीतही त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित बहीणी, भाऊ असा परीवार आहे. क्रिकेट प्रशिक्षक हेमंत मेस्त यांचे ते काका होत.
रामेश्वर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष रमेश मेस्त यांचे निधन
