रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६१ रक्तदात्यानी केले रक्तदान*
*💫कुडाळ दि.१०-:* दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रवी राऊळ यांच्या ४५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत रवी राऊळ मित्रमंडळ आणि प्रकाश मोर्यें मित्रमंडळ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली १० वर्ष हा उपक्रम दोन्ही मंडळे राबवत आहेत. या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यानी रक्तदान केले आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असताना युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते रवी राऊळ यांनी पुढाकार घेत आपल्या वाढदिवशी राबवलेला हा उपक्रम आदर्शवत आहे. या शिबिराला लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. यावेळी त्यांच्या मित्र परिवाराकडून रवी राऊळ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. यावेळी प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, दीपक नारकर, पंचायत समिती सभापती नूतन आईर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश पालव, नागेश आईर, राजा धुरी, रविकांत राऊळ, बाळा सुद्रिक, भरत सावंत, हरी तेजम, दिलीप राऊळ, सहदेव नाईक, दीपक खरात व मित्रपरिवार आदी उपस्थित होते.