Headlines

पर्यंटन महासंघाला सर्वोतोपरी मदत केली जाईल – केंद्रीय मंत्री नारायण राणे

*⚡मालवण ता.१८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून केंद्रीय स्तरावर पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या जिल्ह्यात आणि कोकणातही रोजगाराभिमुख कोणते प्रकल्प आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि हे करताना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पर्यटन व्यावसायिक…

Read More

गणेश चतुर्थी काळात देखील संजू विर्नोडकर आणि टीमचे सेवा कार्य अखंडित सुरू

सावंतवाडी-:कोरोना महामारीच्या काळात पहिल्या पासुन ज्या ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. त्या त्या ठिकाणी संजू विर्नोडकर आणि त्यांची टीम जिल्हाभर निर्जंतुकीकरण करत फिरत आहे. चतुर्थीच्या ऐन सणात देखील संजू विर्नोडकर आणि त्यांची टीमने मळगाव, सावंतवाडी शहरातील माठेवाडा, सालईवाडा, खास्किलवाडा अशा इतर भागातील बाधितांच्या घरात , लगतच्या व आजूबाजूच्या घरात जाऊन निर्जंतुकीकरण केले आहे….

Read More

गणपती विसर्जनासाठी कणकवली नगरपंचायत झाली सज्ज

गणपती सान्यावर असणार तराफा:नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.१८-:* कणकवली नगरपंचायतच्यावतीने 19 सप्टेंबर रोजी कणकवली शहरात होणाऱ्या गणपती विसर्जना निमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. कणकवली शहरात प्रामुख्याने पाच ठिकाणी गणपती मूर्ती मुर्तीचे विसर्जन करण्यात येते. यात गणपती साना, मराठा मंडळ जवळ, कनकनगर, नाथ पै नगर, निम्मेवाडी या ठिकाणी नगरपंचायत मार्फत रात्रीच्या वेळी…

Read More

कोळंब पुलाखालील मातीचा भराव काढण्याच्या मागणीसाठी २२ रोजी खाडीत उतरून आंदोलन

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कोळंब खाडीतील मच्छीमारांनी दिला इशारा *⚡मालवण ता.१८-:* कोळंब पुलाच्या कामासाठी ६ कोटी ३४ लाख ५४ हजार एवढा निधी खर्च करूनही पुलाचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून कामाच्या वेळी ठेकेदाराकडून पुलाच्या खाली कोळंब खाडीपात्रात टाकण्यात आलेला मातीचा भराव अद्यापही काढलेला नाही. यामुळे खाडीपात्रातील मासेमारीवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे . या भरावामुळे पाण्याचा…

Read More

दशावतारी कलाकार विनायक येरागी याला युवा कला गौरव पुरस्कार जाहीर

*⚡मालवण ता.१८-:* मालवण दांडी येथील तरुण दशावतार कलाकार विनायक उर्फ गोट्या येरागी याला पुणे येथील आर्ट बिट्स फाउंडेशनचा यावर्षीचा युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विनायक उर्फ गोट्या येरागी या तरुण कलाकाराने स्त्री अभिनयाच्या जोरावर दशावतार कलाक्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे. जिल्ह्यातील अनेक दशावतारी मंडळामध्ये त्याने स्त्री पात्राच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनया बरोबरच…

Read More

भजनी बुवा, दशावतारी कलावंत यांची विचारपुस कोण करणार?

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांचा सवाल;आता तरी मदतीचा हात पुढे करा! *⚡कणकवली ता.१८-:* लॉकडाऊनला १७/१८ महिने झाले.मात्र या कालावधी भजनी बुवा, दशावतारी कलावंत यांची विचारपुस करावी असे कुणालाही वाटु नये, याला काय म्हणायचे. ना कुणी विचार केला, ना मदतीचा हात पुढे केला,असे हात पसरल्या शिवाय काही आपण करणारच नाही, यालाच लोकशाही म्हणायचे? असा सवाल कणकवली…

Read More

एकाच सिट नंबरचे दोन रिझर्व्हेशन वैभववाडीत प्रवाशी आक्रमक;

खड्ड्यांच्या त्रासाबरोबरच एसटीचा भोंगळपणा *⚡वैभववाडी ता.१८-:* गणेशोत्सव काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले होते. गणेश विसर्जनानंतर गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोकणात दाखल होताना रस्त्यांची दुरवस्था पाहता चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शिवाय परतीच्या प्रवास देखील त्रासदायकच ठरत आहे. शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी वैभववाडी एसटी स्थानकात सायंकाळी…

Read More

वरवडे प्रा. आ. केंद्रात २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिर

छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा उपक्रम *⚡कणकवली ता.१८-:* कणकवली येथील छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र वरवडे येथे २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण तरुणींनी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन गरजूंना रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१८:* सावंतवाडी तालुक्यात आज २ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात १ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुनाबाझार १ आणि ग्रामीण भागात चराठा येथे एक असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ५७ रुग्ण सक्रिय आहेत.

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१८:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६८०कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More
You cannot copy content of this page