आंबा व काजूवर पावसाचा परिणाम
*💫सावंतवाडी दि.०९-:* सावंतवाडी शहरात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. मात्र या पावसामुळे सध्यातरी काही नुकसान झाले नाही. मात्र आंबा व काजूवर या पावसाचा परिणाम होणार आहे. काल मंगळवारपासून वातावरणात गर्मीचे प्रमाण वाढले होते. गेले दोन दिवस थंडीही गायब झाली होती. दुपारीही मोठ्या प्रमाणात गर्मी जाणवत होती. अखेर आज सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे आंबा व काजू मोहोरावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.