ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटनेची रविवारी तातडीची सभा

*शस्त्र परवाना धारकांनी उपस्थित राहण्याचे काटकर यांचे आवाहन*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०९-:* ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटना मालवण या संघटनेची तातडीची सभा रविवार दि १३ डिसेबर रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम साई गणेश मंगल हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष पंढरीनाथ काटकर यानी दिली आहे. यावेळी शस्त्र परवाना नुतणीकरण यासाठी शासनाने वाढविलेले अडिज हजार रुपये शुल्क याबाबत महत्वाची चर्चा करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक शस्त्र परवाना धारक व्यक्तीनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री काटकर यानी केले आहे.

You cannot copy content of this page