भटवाडी येथील पाईपलाईन जीर्ण झाल्याने नव्याने टाकण्यात यावी

दीपाली भालेकर यांची पालिकेच्या मासिक बैठकीत मागणी

*💫सावंतवाडी-:* भटवाडी येथील शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली असून प्रत्येकवेळी नादुरुस्त होत असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे सदर पाईपलाईन नव्याने टाकण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दीपाली भालेकर यांनी आज येथे पालिकेच्या मासिक बैठकीत केली. नगरसेविका भालेकर यांनी सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळा समोर गतिरोधक बसविण्याची मागणी केली. शिवाय मोकाट कुत्र्यांसह माकडांचा उपद्रव वाढला आहे याला आळा घालण्यात यावा, पालिकेचे कर्मचारी दिवसभर राबताना त्यांना सायंकाळच्या वेळी चहाची सोय करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

You cannot copy content of this page