स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केली स्वच्छता
*💫कणकवली दि.०९-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली. स्वच्द भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेचा पंधरावडा असल्याने तसेच ९ जानेवारी ला एक वर्ष पूर्ण होवून दुस-या वर्षात पदार्पण करीत असल्याने ९ डीसेंबर २०२० ते ९ जानेवारी २०२१ या कालावधीत विविध उपयुक्त सामाजिक राबविले जाणार आहेत .यात स्वच्छता जनजागृती , शालेय मुलांसाठी निबंध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. संगीत कला अकादमी या संस्थेअंतर्गत स्थापन करून गावातील कलाकरांना एकत्र करून यातून ज्येष्ठ कलाकार यांना शासनातर्फे वृध्द कलाकार मानधन दिले जाते याकामी सदर कलाकारांचे प्रस्ताव करण्यासाठी पूर्ण सहकार्य या संस्थेचे असणार आहे . याचाच एक भाग म्हणून या संस्थेतर्फे नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता मोहीम आज दिनांक ९ डीसेंबर रोजी राबविण्यात आली . यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर ,उपाध्यक्ष नारायण मोरये , उपसरपंच निरज मोरये , नांदगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.धनश्री रावराणे ,डॉ.दिशा वाळके, संस्थेचे खजिनदार लक्ष्मण मोरये ,भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर ,दिपक मोरजकर ,पंचश्री मोरजकर ,नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर, विव्ठल बिडये ,कमलेश मोदी ,सत्यविजय तांबे आदी यात सहभागी झाले होते. नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता अभियान राबविण्यात आले