शल्य चिकित्सकांची बदली रद्द न केल्यास तीव्र आंदोलन- देव्या सुर्याजी

*💫सावंतवाडी दि.०९-:* जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांनी कोरोना काळात रुग्णांना दिवस रात्र सेवा देत तातडीने उपचार केले असून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या काळात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. तसेच नियमानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांची तीन वर्ष बदली करता येत नसताना केवळ दोन महिन्यातच कोणतेही कारण नसताना किंवा बदलीची विनंती नसताना देखील तडकाफडकी त्यांची बदली औरंगाबाद जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पदी नियुक्ती का करण्यात आली? अशीच तत्परता भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बाबतीत का दाखवण्यात आली नाही असा प्रश्न युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केला आहे. जिल्ह्याला आरोग्याच्या बाबतीत चांगली सेवा देणाऱ्या कार्यतत्पर शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांची बदली रद्द करावी अन्यथा सामाजिक संघटनांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देव्या सूर्याजी यांनी यावेळी दिला आहे

You cannot copy content of this page