Headlines

रामचंद्र परब यांचे निधन

*⚡मालवण ता.०४-:* मालवण मेढा राजकोट येथील रामचंद्र नारायण परब (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. ते उत्तम गणेश मूर्तिकार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, पुतणे, पुतणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मालवण तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी मंगेश परब आणि दिवाणी न्यायालयातील कर्मचारी संदीप…

Read More

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काढणार नोटीस

वित्त समितीत निर्णय:पंधरावा वित्त आयोग निधी प्रकरण सिंधुदुर्गनगरी ता ०४ मागील बांधकाम समिती सभेत आयत्या वेळच्या विषयात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद स्व निधी खर्च आराखड्याला आजच्या सभेत मान्यतेसाठी सभागृहासमोर ठेवण्यात आले होते. मात्र आर्थिक बाबींचा समावेश असलेला आराखडा आयत्या वेळी घेता येत नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीला आज शिवसेना सदस्यांनी कडाडून विरोध केला. तसेच असे…

Read More

आराखडा मंजुरीवरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली बांधकाम समिती सभा

सिंधुदुर्गनगरी ता ०४ मागील बांधकाम समिती सभेत आयत्या वेळच्या विषयात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद स्व निधी खर्च आराखड्याला आजच्या सभेत मान्यतेसाठी सभागृहासमोर ठेवण्यात आले होते. मात्र आर्थिक बाबींचा समावेश असलेला आराखडा आयत्या वेळी घेता येत नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीला आज शिवसेना सदस्यांनी कडाडून विरोध केला. तसेच असे नियमबाह्य काम करता येते का असा प्रश्न…

Read More

मालवण तालुक्यातील शाळांच्या घंटा वाजल्या…

मालवण : (प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे गेले वर्षभर बंद असलेल्या राज्यातील शाळा राज्य शासनाच्या आदेशानुसार आज सुरू झाल्या असून मालवण शहरासह तालुक्यातही शाळांच्या घंटा वाजून पुन्हा एकदा शाळा गजबजल्या आहेत. काही अपवाद वगळता मालवण शहरात आठवी ते बारावी व तालुक्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरविण्यात आल्या असून शाळा चालक व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत…

Read More

पाचवी ते आठवी शाळांची आज वाजली घंटा

१७६ पैकी १७१ शाळांमध्ये किलबिलाट पुन्हा सुरू…. *⚡सावंतवाडी ता.०४ विनय वाडकर-:* गेल्या दीड वर्षापासून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांच्या घंटा आज वाजल्याने ऑनलाईन शिक्षणात बंदिस्त झालेल्या मुलांसह, शिक्षक आणि शाळांनी मोकळा श्वास घेतला आहे. सावंतवाडी तालुक्यातील १७६ शाळां पैकी आज १७१ शाळा सुरू झाल्या आहेत. यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी गटशिक्षण अधिकारी कल्पना बोडके यांनी…

Read More

गांधींचे विचार मार्गदर्शक ठरतील – प्राचार्य देऊलकर

*⚡वेंगुर्ला ता.०४-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप शितोळे यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. महात्मा गांधींच्या विचारांचे महत्त्व लक्षात घेता जागतिक पातळीवर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधींचे विचार सर्वांना मार्गदर्शक ठरतील,असे मत प्राचार्य डॉ.देऊलकर यांनी व्यक्त…

Read More

स्वच्छता चित्ररथाचे उद्घाटन

*⚡वेंगुर्ला ता.०४-:* स्वच्छ भारत दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला पंचायत समितीमार्फत स्वच्छतेच्या प्रसार आणि प्रचारासाठी बनविण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. हा चित्ररथ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींपर्यंत पोहचणार आहे. तत्पूर्वी सभापती अनुश्री कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी…

Read More

त्या धोकादायक शाळेच्या इमारतीत मुलांना अनिश्चित काळासाठी न पाठवण्याचा पालकांचा निर्णय…

गटविकास अधिकारी उमा घारगे – पाटील यांना दिले निवेदन वेंगुर्ला: मे महिन्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळात वेंगुर्ले शहरातील शाळा नं. २ वर वडाचे झाड पडून नुकसान झाले होते. हे झाड काढण्याबाबत वारंवार लेखी पत्राद्वारे कळवून सुद्धा अद्यापपर्यंत दखल न घेतल्याने अशा धोकादायक इमारतीमध्ये ४ ऑक्टोबर पासून सुरू होत असलेल्या शाळेत मुलांना अनिश्चित काळासाठी न पाठवण्याचा निर्णय…

Read More

नगरपरिषद मधील कर्मचाऱ्यांना मोफत कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

तालुका विधी सेवा समिती व सावंतवाडी वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते आयोजन *⚡सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व सावंतवाडी वकील संघटना यांच्या संयुक्त विध्यमानाने सावंतवाडी नगरपरिषद येथे कायदे विषयक मोफत मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. या शिबिरानमधून सावंतवाडी नगरपरिषद येथे कर्मचारी, अधिकारी वर्गाला अँड. स्वप्नील कोलगावकर व अँड वैभव चव्हाण यांनी…

Read More

कणकवलीत आयुष्यमान भारत योजनेचा विशेष लाभ मिळणार

आम.नितेश राणे यांचा पुढाकार;कणकवली प.स. येथे उद्यापासून नोंदणी कणकवली 4 ऑक्टोबर (प्रतिनिधी)- आम.नितेश राणे यांच्या पुढाकाराने कणकवली विधानसभा मतदार संघातील जनतेला केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा विशेष लाभ मिळणार आहे.या योजनेची सुरवात कणकवली तालुकयात 5 ऑक्टोबर 2021 राजी स .11.00 वा पासून कणकवली पंचायत समितीच्या मागील बाजूस असणाऱ्या इंदीरा आवास योजनेच्या डेमो हाऊसच्या इमारतीमध्ये होणार…

Read More
You cannot copy content of this page