रामचंद्र परब यांचे निधन

*⚡मालवण ता.०४-:* मालवण मेढा राजकोट येथील रामचंद्र नारायण परब (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. ते उत्तम गणेश मूर्तिकार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, पुतणे, पुतणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मालवण तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी मंगेश परब आणि दिवाणी न्यायालयातील कर्मचारी संदीप परब यांचे ते काका होत.

You cannot copy content of this page