तालुका विधी सेवा समिती व सावंतवाडी वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते आयोजन
*⚡सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व सावंतवाडी वकील संघटना यांच्या संयुक्त विध्यमानाने सावंतवाडी नगरपरिषद येथे कायदे विषयक मोफत मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. या शिबिरानमधून सावंतवाडी नगरपरिषद येथे कर्मचारी, अधिकारी वर्गाला अँड. स्वप्नील कोलगावकर व अँड वैभव चव्हाण यांनी विविध कायद्या मधील तरतुदीची माहिती विषद केली. या प्रसंगी मुख्यधिकारी श्री. जयंत जावडेकर, नगरसेवक अँड. परिमल नाईक, सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
