*⚡वेंगुर्ला ता.०४-:* स्वच्छ भारत दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला पंचायत समितीमार्फत स्वच्छतेच्या प्रसार आणि प्रचारासाठी बनविण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. हा चित्ररथ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींपर्यंत पोहचणार आहे. तत्पूर्वी सभापती अनुश्री कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील, द्रौपदी नाईक, अश्विनी परब व कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता चित्ररथाचे उद्घाटन
