पाचवी ते आठवी शाळांची आज वाजली घंटा

१७६ पैकी १७१ शाळांमध्ये किलबिलाट पुन्हा सुरू….

*⚡सावंतवाडी ता.०४ विनय वाडकर-:* गेल्या दीड वर्षापासून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांच्या घंटा आज वाजल्याने ऑनलाईन शिक्षणात बंदिस्त झालेल्या मुलांसह, शिक्षक आणि शाळांनी मोकळा श्वास घेतला आहे. सावंतवाडी तालुक्यातील १७६ शाळां पैकी आज १७१ शाळा सुरू झाल्या आहेत. यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी गटशिक्षण अधिकारी कल्पना बोडके यांनी प्रत्येक शाळेत जाऊन शाळांमध्ये मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. आज पासून जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिल्याने आज सर्व शाळा गजबजला आहेत.

You cannot copy content of this page