Headlines

टाकाऊतून टिकाऊ’ कापडी पिशवी स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.०६-: प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग घडविण्याच्या उद्देशाने मिशन आधार, सिंधुदुर्गच्या वतीने ‘टाकाऊतून टिकाऊ’ कापडी पिशवी स्पर्धा-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा जिल्हास्तरीय असून, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेल्या टिकाऊ कापडी पिशव्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख ५,००१ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ३,००१ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी २,००१ रुपये व सन्मानचिन्ह, तसेच पाच उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १,००१ रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी पिशवी पूर्णपणे टाकाऊ वस्तूंमधून तयार केलेली असावी. पिशवी मजबूत व वापरण्यायोग्य असणे आवश्यक असून, ती स्वतः तयार केल्याचा कटिंगपासून पूर्ण तयार होईपर्यंतचा लघु व्हिडिओ स्पर्धकांकडे असणे बंधनकारक आहे. सहभागासाठी ५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी तयार केलेली पिशवी व स्पर्धकाची माहिती २५ ऑगस्टपर्यंत कुडाळ, मालवण किंवा सावंतवाडी येथील मिशन आधारच्या निर्धारित केंद्रांवर जमा करावी लागणार आहे. स्पर्धेसाठी जमा केलेल्या पिशव्या संस्थेकडे कायमस्वरूपी राहतील. बक्षीस वितरण समारंभ २५ ऑगस्टनंतरच्या एका रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती स्पर्धकांना दूरध्वनीद्वारे दिली जाईल.
स्पर्धा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी मर्यादित आहे. अधिक माहितीसाठी ९४०५३३३११३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन मिशन आधार, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page