Headlines

येत्या रविवारी कुडाळमध्ये ‘येरे घना’ कविसंमेलन

को.म.सा.प. शाखा कुडाळचे आयोजन

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळच्या वतीने रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता “येरे घना ” कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय सेमिनार हॉल येथे होणाऱ्या संमेलनामध्ये सहभाग घेणाऱ्या कवींना आपल्या एका कवितेचे वाचन करता येईल . साहित्यप्रेमी कवींनी, तसेच महाविद्यालयीन नवोदित कवींनीही संमेलनामध्ये सहभाग घेऊन कविसंमेलन यशस्वी करावे असे आवाहन को. म. सा. प. शाखा-कुडाळचे अध्यक्ष प्रा.संतोष वालावलकर यांनी केले आहे.
सहभाग घेणाऱ्या कवींनी आपली नावं को.म.सा.प.कुडाळ, कार्यवाह सुरेश पवार (मोबा.९४२२६ ३३११८) यांच्याकडे लवकरात लवकर नोंदवावीत.

You cannot copy content of this page