Headlines

देसाई स्कूलमध्ये मुलांचे स्वागत

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे बुधवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोविडमुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची बंद असलेली शाळा पुन्हा १ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. मुख्याध्यापिका मनाली होडावडेकर यांच्यासह वर्गशिक्षिकांनी मुलांचे औक्षण करुन त्यांना चॉकलेट देऊन स्वागत केले. कोरोनाचे नियम पाळून शाळेमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

Read More

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात जन आंदोलन उभारण्याची गरज ः मनोज खाडये

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* सेक्युलर भारत सरकारच्या अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणकडून प्रमाणपत्र घेतल्यावर खाजगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का? हे प्रमाणपत्र देणा-या संघटनापैकी काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्माधांना सोडविण्यासाठी न्यायालयीन सहाय्य करत आहे. निधर्मी भारतात अशी धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने हलाल प्रमाणीकरण पद्धत तात्काळ बंद करावी…

Read More

एचआयव्ही बाधितांशी मैत्रीपूर्वक व्यवहार करा-पांडुरंग गावडे

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* आपल्या परिसरातील एचआयव्ही ग्रस्त लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. समाजात एड्स संबंधी असलेली गैरसमज दूर करून त्यांना शिक्षित करण्याची अत्यंत गरज आहे. एचआयव्ही बाधित लोकांशी भेदभाव न करता मैत्रीपूर्वक व्यवहार करावे असे मत प्रमुख पाहूणे डॉ. पांडुरंग गावडे यांनी व्यक्त केले. येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने जागतिक एड्स…

Read More

पावसामुळे किलबिल जल्लोष कार्यक्रम पुन्हा रद्द

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती *⚡कणकवली ता.०२-:* कणकवली शहरात 4 डिसेंबर रोजी समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला किलबिल जल्लोष कार्यक्रम पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने येत्या 9 डिसेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरातील लहान…

Read More

लोरे नं. १, गुरववाडी येथे श्री कुलस्वामिनी मंदिर जिर्णोद्धार सोहळा

*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील, लोरे नं. १, गुरव वाडी येथे श्री कुलस्वामिनी मंदिर जिर्णोद्धार सोहळा,श्री गणेश, श्री कुलस्वामीनी आणि श्री कुलस्वामींच्या मुर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार ८ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे मिराशी गुरव समाजाच्या श्री कुलस्वामीनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि श्री. गणेश, श्री कुलस्वामीनी, श्री कुलस्वामी यांच्या मुर्त्यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा…

Read More

रामेश्वर मंदिर परिसरातील हायमास्टचे लोकार्पण

*⚡वेंगुर्ला ता ०२-:* आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून स्थानिक आमदार विकास निधीतून वेंगुर्ला रामेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या हायमास्टचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या ३० नोव्हेंबर रोजी रामेश्वराच्या जत्रोत्सवा दिवशी करण्यात आले. प्रारंभी शिवसेनेतर्फे हायमास्टच्या ठिकाणी श्रीफळ ठेवले. तर या सेवेबद्दल रामेश्वर देवस्थानच्या प्रथमेश गुरव यांनी गा-हाणे घातले. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल…

Read More

शिक्षण सभापतींनी केले विद्यार्थ्यांचे औक्षण

पहिली ते चौथीचे वर्ग झाले सुरू;साटेली-भेडशी शाळेत डॉ अनिशा दळवी यांनी लावली उपस्थिती *दोडामार्ग / सुमित दळवी* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाऊणे दोन वर्षे बंद असलेल्या शाळा कालपासून शासनाच्या आदेशान्वये इयत्ता पहिलीपासून सुरू झाल्या. या दिवसाची सुरुवात साटेली भेडशी केंद्रशाळेसह सर्वच शाळांमधून उत्साहवर्धक वातावरणात झाली. या दिवशी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी…

Read More

दाणोली वळणावर कंटेनर ट्रकचा अपघात

पहाटे रस्त्याचा अंदाज न आल्याने घडली घटना *सावंतवाडी ता.०२-:* दाणोली येथील वळणावर कंटेनर ट्रकचा अपघात झाला असून, रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला असून, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, या अपघातात कोणाला दुखापद झाली की नाही याची मात्र माहिती अद्याप समजू शकले नाही.

Read More

सावंतवाडी नगराध्यक्षांना त्यांचा ‘ओव्हर’ कॉन्फिडन्स नडणार

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा टोला : पराभूत नगरसेवक जाहीर करावीत *⚡सावंतवाडी ता.०१-:* आगामी निवडणुकीत २० पैकी १६ नगरसेवक निवडणूक आणणार असा दावा करणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणते ४ नगरसेवक पराभूत होणार आहेत. ते देखील जाहीर करावे. असे सांगत ‘ कॉन्फिडन्स ‘ असावा पण तो ‘ओव्हर ‘ नसावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक…

Read More

चिमुकल्यांना चॉकलेट आणि बिस्कीट वाटून अर्चना घारे परब यांचा वाढदिवस राष्ट्रवादीकडून साजरा…

*⚡सावंतवाडी ता.०१-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीतील जिल्हा परिषद शाळा नं. ७ मध्ये चिमुकल्यांना चॉकलेट, बिस्किटच वाटप करण्यात आले आहे. आजपासून शाळा सुरु झाल्यानं वाढदिवसाच औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी मुलांचही स्वागत करण्यात आल. याप्रसंगी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page