*⚡वेंगुर्ला ता.०२-:* आपल्या परिसरातील एचआयव्ही ग्रस्त लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. समाजात एड्स संबंधी असलेली गैरसमज दूर करून त्यांना शिक्षित करण्याची अत्यंत गरज आहे. एचआयव्ही बाधित लोकांशी भेदभाव न करता मैत्रीपूर्वक व्यवहार करावे असे मत प्रमुख पाहूणे डॉ. पांडुरंग गावडे यांनी व्यक्त केले. येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. जे.वाय.नाईक, प्रा.विनोद पवार, प्रा.बी.जी.गायकवाड, शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. प्रा.एल.बी.नैताम यांनी एड्स हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. एचआयव्ही व्हायरसमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होऊन अनेक आजारांची लागण होण्याची भीती असते असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सदाशिव चुकेवाड यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.विवेक चव्हाण यांनी आभार मानले.
एचआयव्ही बाधितांशी मैत्रीपूर्वक व्यवहार करा-पांडुरंग गावडे
