*⚡वेंगुर्ला ता.०२-:* सेक्युलर भारत सरकारच्या अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणकडून प्रमाणपत्र घेतल्यावर खाजगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का? हे प्रमाणपत्र देणा-या संघटनापैकी काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्माधांना सोडविण्यासाठी न्यायालयीन सहाय्य करत आहे.
निधर्मी भारतात अशी धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने हलाल प्रमाणीकरण पद्धत तात्काळ बंद करावी यासाठी सर्वसामान्य प्रत्येक हिंदु नागरिकाने या जनआंदोलनामध्ये सहभागी होणे काळाची गरज आहे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे गुजरात व गोवा राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक मनोज खाडये यांनी केले.
वेंगुर्ला येथील आयोजित पत्रकार चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तरुण भारतचे के.जी.गावडे, प्रदीप सावंत, प्रहारचे दाजी नाईक, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कौलगेकर, पुढारीचे अजय गडेकर, लोकमतचे प्रथमेश गुरव, सामनाचे विनायक वारंग तर साप्ताहिक किरातच्या संपादिका सिमा मराठे, कोकण संवादच्या पत्रकार आराधना कुंडेकर, हिंदू जनजागृती समितीचे संदेश गावडे, गोपाळ जुवलेकर आदी उपस्थित होते. हलाल या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार वैध आहे. मूलतः मांसाच्या संदर्भातील हलालची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालय, गृहनिर्माण संस्था अशा अनेक गोष्टीत केली जात आहे. हलाल इंडिया जमियात उलमा ई हिंद सारख्या इस्लामी संस्थांना शुल्क देऊन त्यांच्याकडून हलाल प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले गेले आहे. कुठलीही वस्तू खरेदी करताना ग्राहकाचा हक्क वापरून हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालणे, अशा लहान लहान गोष्टीतूनच मोठी जनजागृती होऊन हलाल अर्थव्यवस्था आपण रोखू शकतो असे श्री. खाडये यांनी सांगितले.
