पावसामुळे किलबिल जल्लोष कार्यक्रम पुन्हा रद्द

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली शहरात 4 डिसेंबर रोजी समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला किलबिल जल्लोष कार्यक्रम पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने येत्या 9 डिसेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली शहरातील लहान मुले व त्यांच्या पालकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता ताणलेली असताना पुन्हा एकदा हा कार्यक्रम रद्द करावा लागत असल्याने श्री नलावडे यांनी शहरवासीयांची दिलगिरी व्यक्त केली आहे. पावसाचे संकट टळल्यानंतर पुन्हा या कार्यक्रमाची नव्याने रूपरेषा जाहीर करण्यात येईल असेही श्री. नलावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page