लोरे नं. १, गुरववाडी येथे श्री कुलस्वामिनी मंदिर जिर्णोद्धार सोहळा

*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील, लोरे नं. १, गुरव वाडी येथे श्री कुलस्वामिनी मंदिर जिर्णोद्धार सोहळा,श्री गणेश, श्री कुलस्वामीनी आणि श्री कुलस्वामींच्या मुर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार ८ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे मिराशी गुरव समाजाच्या श्री कुलस्वामीनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि श्री. गणेश, श्री कुलस्वामीनी, श्री कुलस्वामी यांच्या मुर्त्यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच कलश रोहन, श्री सत्यनारायणाची महापूजा, हळदीकुंकू समारंभ, ओटी भरणे, क्रीडा स्पर्धा, भजने, नृत्य स्पर्धा, हरिपाठ, दशावतारी नाटक, डबलबारी, समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा, तसेच कोविड योध्यांचा सत्कार समारंभ व इतर असा भरगच्च कार्यक्रम गुरव समाजाच्यावतीने सोमवार ६ ते गुरुवार ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असे आवाहन मिराशी गुरव मराठा समाज हितावर्धक संस्था, लोरे नं. १ कार्यकारी मंडळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page