*⚡वेंगुर्ला ता ०२-:* आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून स्थानिक आमदार विकास निधीतून वेंगुर्ला रामेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या हायमास्टचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या ३० नोव्हेंबर रोजी रामेश्वराच्या जत्रोत्सवा दिवशी करण्यात आले.
प्रारंभी शिवसेनेतर्फे हायमास्टच्या ठिकाणी श्रीफळ ठेवले. तर या सेवेबद्दल रामेश्वर देवस्थानच्या प्रथमेश गुरव यांनी गा-हाणे घातले. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, शहर प्रमुख अजित राऊळ, नगरसेवक प्रकाश डिचोलकर, संदेश निकम, शहर समन्वयक विवेक आरोलकर, देवस्थान मानकरी सुनील परब, सुरेश भोसले, गजानन गोलतकर, शैलेश परूळेकर, मिथुन सातार्डेकर, प्रसाद गुरव, गौतम मुळे, उदय गोवेकर, केतन जगताप, कोमल सरमळ, निखिल घोटगे आदी उपस्थित होते. फोटोओळी – रामेश्वर मंदिर परिसरातील हायमास्टचे उद्घाटन जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते झाले.
