शिक्षण सभापतींनी केले विद्यार्थ्यांचे औक्षण

पहिली ते चौथीचे वर्ग झाले सुरू;साटेली-भेडशी शाळेत डॉ अनिशा दळवी यांनी लावली उपस्थिती

*दोडामार्ग / सुमित दळवी* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाऊणे दोन वर्षे बंद असलेल्या शाळा कालपासून शासनाच्या आदेशान्वये इयत्ता पहिलीपासून सुरू झाल्या. या दिवसाची सुरुवात साटेली भेडशी केंद्रशाळेसह सर्वच शाळांमधून उत्साहवर्धक वातावरणात झाली. या दिवशी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थांना औषण ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच विद्यार्थानचे आपल्या बँगेतील ओज कमी व्हाव यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग याच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थासाठी दिलेल्या लाँकरचेही यावेळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी दोडामार्ग नदाफ, विस्तार अधिकारी बाळेकुंद्री मँडम,केंद्रप्रमुख सुर्यकांत नाईक मुख्याध्यापिका पुनम पालव तसेच इतर शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page