चिमुकल्यांना चॉकलेट आणि बिस्कीट वाटून अर्चना घारे परब यांचा वाढदिवस राष्ट्रवादीकडून साजरा…

*⚡सावंतवाडी ता.०१-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीतील जिल्हा परिषद शाळा नं. ७ मध्ये चिमुकल्यांना चॉकलेट, बिस्किटच वाटप करण्यात आले आहे. आजपासून शाळा सुरु झाल्यानं वाढदिवसाच औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी मुलांचही स्वागत करण्यात आल. याप्रसंगी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई, तालुकाध्यक्ष उद्योग व व्यापार नवल साटेलकर, नियाज शेख, संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page