Headlines

“विद्यार्थ्यांसोबत पंक्तीत बसून सीईओंनी घेतला पोषण आहाराचा आस्वाद” …

⚡वैभववाडी ता.१४-: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासुर यांनी पी एम श्री महालक्ष्मी विद्या मंदिर कोकिसरे शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची उजळणी घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांबरोबर पंक्तीत बसून पोषण आहार घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासुर त्यांनी बुधवारी पीएमसी महालक्ष्मी विद्यामंदिर कोकीसरे शाळेला भेट देत शाळेतील सर्व उपक्रमाची विद्यार्थ्यांची व शिक्षकांची माहिती घेतली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबद्दल व शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केली पण शिक्षक व अधिकारी यांच्या कामकाजावर मात्र नाराजी व्यक्त करत त्यांनी सूचनाही केल्या परत पंधरा दिवसांनी मी शाळेला भेट देणार त्यावेळी मला शाळेतील कामकाज सुधारलेले दिसले पाहिजे असे सांगितले शाळेतील पाण्याची व्यवस्था परसबाग स्वच्छता ग्रह अंगणवाडी अधिक ठिकाणी भेटते त्यांनी माहिती घेतली.
यावेळी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहा माने गटशिक्षणाधिकारी थोरात केंद्रप्रमुख चेतन बोडेकर, सरपंच नारकर माजी सरपंच अवधूत नारकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व समिती सदस्य बंडू वळंजू, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर ग्राम विकास अधिकारी संभाजी वाघमोडे शिक्षक जयवंत मोरे, आधी आधी विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो पीएम श्री महालक्ष्मी विद्यामंदिर शाळेला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासुर, गटविकास अधिकारी वाघ गटशिक्षणाधिकारी थोरात,
फोटो विद्यार्थ्यांसोबत पोषण आहाराचा स्वाद घेताना डॉक्टर अपूर्वा बासूर गटविकास अधिकारी वाघ सहाय्यक गटविकास अधिकारी माने विद्यार्थी उपस्थित छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page