कृषीआधारित उद्योगांना चालना देण्याचे आवाहन” ..
वैभववाडी प्रतिनिधी
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासुर यांनी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड या गूळ उत्पादन प्रकल्पाला भेट दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला गूळ उद्योग प्रकल्प म्हणून उल्लेख करण्यात येत असलेल्या या प्रकल्पातील उत्पादन प्रक्रियेची त्यांनी माहिती घेतली. गूळ निर्मितीची पद्धत, उत्पादनाचे विविध टप्पे आणि उद्योगाचे कामकाज याविषयी त्यांनी जाणून घेतले. स्थानिक पातळीवर कृषीआधारित उद्योगांची उभारणी आणि उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून उत्पादननिर्मितीला चालना देण्यासाठी असे प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी शेतकरी आणि उद्योजक यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सभापती सिद्धेश रावराणे उपसभापती सांची कोलते जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे श्रावणी रावराणे भाजप तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे तहसीलदार सूर्यकांत पाटील गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ साळे गटविकास अधिकारी स्नेहा माने सरपंच लीना पांचाळ साधना नकाशे आदी ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो नाधवडे येथील नैसर्गिक गुळ प्रकल्पाची पाहणी करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासुर सिद्धेश रावराणे सुधीर नकाशे छाया संजय शेळके वैभववाडी

