Headlines

नेरूर-गोंधयाळेवाडीत पुन्हा टोक्यांचे संकट ; ग्रामस्थांना धास्ती

जेवणात, अंथरुणात टोक्यांचा वावर; ग्रामस्थांचे जगणे मुश्किल:उपद्रव वाढण्यापूर्वी बंदोबस्त करण्याची मागणी..

⚡कुडाळ ता.१४-: नेरूर-गोंधयाळेवाडीत टोकांच्या उपद्रवाने पुन्हा डोकं वर काढलंय. या लोकवस्तीच्या बाजूलाच एमआयडीसी परिसरात शासकीय गोदाम असल्याने या गोदामातून हा टोका वस्तीत येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून त्यामुळे जगणे मुश्किल झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. या टोक्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
एमआयडीसी परिसराला लागूनच नेरुर-गोंधयाळेवाडी वस्ती आहे. त्यांच्या वस्तुपासूनच जवळच शासनाचे धान्य गोदाम आहे. या गोदामात ठेवलेल्या धान्याला टोका हा कीटक लागतो. मोठ्या संख्येने हा कीटक पसरत असल्याने तो वारा आणि हवेसोबत नजीकच्या वस्तीत येऊ लागला आहे. घराघरात, घरातल्या जेवणात, अंथरुणात हे कीटक सापडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोठ्या संख्येने हे कीटक येत असल्याने त्यांचा बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे. अतिशय लहान असलेल्या तान्ह्या मुलांना या टोक्यामुळे धोका असल्याने या टोक्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गर्मस्थ करत आहेत.
साधारण मे-जून २०२४ मध्ये हा टोक्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी शासकीय गोदामासमोर जोरदार आंदोलन केले होते. अगदी आत्मदहनचा इशारा सुद्धा दिला होता. पण नंतर पाऊस सुरु झाला आणि टोक्याचा प्रभाव कमी झाला. त्यांनतर गेल्यावर्षी २०२५ मध्ये टोक्याचा प्रभाव जास्त जाणवला नव्हता. २०२४ मध्ये मे-जून मध्ये अधिक धान्य गोदामामध्ये साठवून ठेवल्याने टोक्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यांवर ते धान्य अन्यत्र हलविण्यासाठी ग्रामस्थानी आंदोलन केले होते. मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यापासूनच टोक्याचा त्रास होऊ लागला आहे.
सध्या या टोक्यांची सुरुवात आहे. पुढे पुढे जस जसा उन्हाळा वाढत जाईल तशी याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे यावर शासनाने वेळीच उपाययोजना करून या त्रासातून सुटका करावी अशी मागणी नेरूर-गोंधयाळेवाडीवासियांनी केली आहे.

You cannot copy content of this page