तहसीलदार अजय पाटणे यांनी केली कारवाई.
मालवण (प्रतिनिधी)-: मालवण तालुक्यात अवैध पणे वाळू उपसा व वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली असून तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसात काळसे व नांदरुख गावात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडण्यात आले.
हा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. डंपर मालक रजत प्रसादी याला नोटीस बजावण्यात आली आहे. काल रात्री नांदरुख घरटनवाडी येथे याच पथकाने कारवाई करत डंपर क्रमांक केए-१९ एडी-१३७६ पकडला. या डंपरमध्ये दोन ब्रास वाळू सापडली. हा डंपर महसूलने ताब्यात घेतला आहे. डंपर चालक सिद्धराम चव्हाण याला कारवाई बाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
हे दोन्ही डंपर महसूल विभागाने ताब्यात घेतले असून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेरी मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंगरे, धामापूर तलाठी एस. के. थोरात, कोतवाल पी. एस. चव्हाण, स्वप्नील पालकर यांच्या पथकाने काळसे रवळनाथ मंदिर नजीकच्या रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर क्रमांक एम. एच. ०७ एक्सएमएम-१७१७ पकडला. डंपरमध्ये दोन ब्रास वाळू सापडली.
