⚡वैभववाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांनी दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ वैभववाडी येथे दुर्गादर्शन घेतले.
नवरात्रीतून महिला व बालकल्याण योजनांचा जागर या उपक्रमाचे कौतुक केले .
यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जि प सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने, मंडळाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र पाताडे सचिव संजय रावराणे उपाध्यक्ष संजय सावंत संस्थापक अध्यक्ष शांताराम रावराणे आदी मंडळाचे सदस्य कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

