Headlines

“सावंतवाडीत उद्या भाजपच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिर…

जिमखाना मैदानावर जय्यत तयारी; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन..

⚡सावंतवाडी, ता. १४-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजपच्या वतीने उद्या, १५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी जिमखाना मैदानावर भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर जिमखाना मैदानावर जय्यत तयारी सुरू असून, मोठा मंडप उभारण्यात आला आहे. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र भाजपचे सहभागी सदानंद शेठ तानावडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच आवश्यक आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी मळेवाड, वेंगुर्ला, बांदा व आंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर सावंतवाडीतील शिबिरालाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नेत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, दंतरोग, जनरल मेडिसिन, त्वचारोग आणि फिजिओथेरपी आदी विविध विभागांतील तज्ज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रुग्णांना वैद्यकीय तपासणी व निदानानंतर ऑपरेशनची आवश्यकता असल्यास पुढील उपचारांचे नियोजन करण्यात येणार असून, शासनाच्या विविध आरोग्य योजनांअंतर्गत संबंधित रुग्णालयांमध्ये उपचार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे. या उपक्रमासाठी सह्याद्री फाउंडेशनचेही सहकार्य लाभणार आहे. सावंतवाडी शहरासह तालुक्यातील गरजू रुग्ण व नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे.”

You cannot copy content of this page