Headlines

वजराट ग्रामपंचायत उपसरपंचपदी ग्रामसमृद्धी पॅनलचे चेतन नाईक यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील
वजराट ग्रामपंचायत उपसरपंचपदी ग्रामसमृद्धी पॅनलचे सदस्य चेतन सावळाराम नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अनन्या पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ग्रामपंचायत सभागृहात ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी त्यांचे सरपंच अनन्या पुराणिक, श्री गिरेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव उर्फ ताता परब व अन्य ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
दिपीका राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड संपन्न झाली.
यावेळी श्री गिरेश्वर – सातेरी सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोहर परब, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबुराव परब, माजी सरपंच अ. बा. परब, माजी उपसरपंच शाम पेडणेकर , प्रियांका केरकर, सदस्य नम्रता देसाई, रसिका मैस्त्री, आनंद पुराणिक, संदिप पेडणेकर, प्रेमानंद सावंत भोसले, साईप्रसाद केरकर, नितीन सावंत, मकरंद गोंधळेकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण भोई, ग्रामपंचायत कर्मचारी प्रविण गावडे, शुभम मुंजी, पूर्वा कांदे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page