दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई..

⚡सावंतवाडी ता.१४-: यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिंहगड पब्लिक स्कूल, लोणावळा येथे आयोजित सीबीएसई झोनल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत दमदार कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दोन सुवर्णपदके, दोन रौप्यपदके आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. यात नववीतील गौरव आनंद वारंग आणि अनुराग आशिष राणे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. नववीतील संकेत राजेंद्र राणे आणि करण कृष्णा गावडे यांनी रौप्यपदक मिळवले. आठवीतील आयुष आदिनाथ गवस याने कांस्यपदक प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर आणि एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
