जिल्ह्यातील सरसकट शाळा बंद नको
प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन *⚡सिंधुदुर्गनगरी ता १२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या काळात सरसकट बंद केलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपैकी काही शाळा नियमांना बांधील राहून पुन्हा सुरू करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाधकाऱ्यांकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय…
