*⚡मालवण ता.१२-:* मालवण तालुक्यातील हेदूळ गावातील आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य वर्धिनी केंद्राला आवश्यक असणारे ऑफिस टेबल सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक एस. पी. सामंत यांनी प्रदान केले. त्यावेळी सरपंच श्री. नंददिपक गावडे, डाॅ. महादेव हरमळकर, आरोग्य सेवक राजन गवस, सौ. शलाका नार्वेकर, सारिका चव्हाण आदी उपस्थित होते. या मदतीबद्दल श्री. सामंत यांचे आभार मानण्यात आले.
हेदूळ आरोग्य उपकेंद्राला ऑफिस टेबल भेट
