*⚡मालवण ता.१२-:* केंद्र सरकारशी संलग्न जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग आयोजित येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सौजन्याने १२० दिवसांच्या शॉर्ट टर्म कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मोजकीच बॅच असून या कोर्समध्ये हॉटेल व्यवसायाच्यादृष्टीने तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
हॉटेल रुम अटेंडन्सची जबाबदारी, त्याची. कर्तव्ये, भूमिका आदी बाबी शिकविल्या जाणार आहेत. या कोर्ससाठी माफक फी असून हा कोर्स १५ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना करता येईल. कोर्स पूर्ण केल्यावर नोकरी-व्यवसायाच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, याचेही मार्गदर्शन केले जाणार आहे. कोर्स पूर्ण होऊन परीक्षा दिल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल. अधिक माहितीसाठी प्रा. कैलास राबते, मोबाईल-८३८१०२२५२९ व प्रा. अन्वेषा कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी केले आहे.
