*⚡कणकवली ता.१२-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलच्या इयत्ता ५ वी व ८ वी च्या एकूण ४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये यश संपादित करीत शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
इयत्ता ५ वी ग्रामीण सर्वसाधारण गटातून संस्कार सुरेश करांडे या विद्यार्थ्याने ७५.३३ % गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत ३५ वा आला आहे.तर इयत्ता ८ वी ग्रामीण सर्वसाधरण गटातून कु.संचिता रवींद्र केंगाळे या विद्यार्थिनीने ६७.११ % गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत ७ वी येण्याचा बहुमान पटकावला आहे. याच गटात ८ वी ची विद्यार्थिनी कु.हसरी विनायक म्हाडेश्वर हिने ६५.१० % गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत ११ वी आली आहे.तर कु.अर्पिता अरविंद पाटील या विद्यार्थिनीने ५७.७१ % एवढे गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत ४० वी आली आहे.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष- प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष – भिकाजी कर्ले,सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार – संदेश धुमाळे,तसेच शाळेचे मुळ्याध्यापक – प्रकाश अकिवाटे, पर्यवेक्षक – संजय सानप आदींनी यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
