*⚡मालवण ता.१२-:* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कुलने यश संपादन केले आहे. या परीक्षेत अपेक्षा कांदळगावकर, सॅव्हिया फर्नांडिस, सानिका जोशी यांनी शिष्यवृत्ती पटकाविली आहे. सन २०२०- २१मध्ये घेतल्या गेलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
या परीक्षेमध्ये नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूल आचरा, या शाळेच्या अपेक्षा अशोक कांदळगावकर(५६.६६%), सॅव्हिया संतातोन फर्नांडिस(५४.६६%), सानिका राजन जोशी(५०.६६%) या विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या विशेष गुणवत्ता यादीमध्ये येत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ‘द आचरा पीपल्स असोसिएशन’चे पदाधिकारी, स्थानिक कमिटी चेअरमन निलेश सरजोशी, खजिनदार परेश सावंत, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले.
