चिंदर ग्रामपंचायत येथील ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश कदम यांचा निरोप समारंभ संपन्न

*⚡मालवण ता.१२-:* चिंदर ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश गणपत कदम यांचा निरोप समारंभ ग्रामपंचायत चिंदरच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे यांंनी कदम यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कणकवली, घोणसरी, जानवली, कलमठ, रामगड, देवबाग असा ग्रामसेवक म्हणून प्रवास करत कदम हे चिंदर येथे ग्रामविस्तार अधिकारी पदापर्यंत पोहोचले. कदम यांनी ग्रामपंचायतीसाठी विविधांगी उपक्रम राबवले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी केले. तर सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, भाजप तालुध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रभारी विस्तार अधिकारी युवराज चव्हाण यांनी आपले विचार मांडले.

यावेळी आशा स्वंयसेवीका, महिला बचत गट, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, उद्योजक प्रकाश मेस्री, पोलीस पाटिल दिनेश पाताडे, दिगंबर जाधव, देवेंद्र हडकर, माजी सरपंच घागरे, माजी उपसरपंच अनिल गांवकर,मोरेश्वर गोसावी रणजित दत्तदास, विश्राम माळगांवकर, आबा पवार, अजित पाडावे, बाबूराव कासले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page