Headlines

इस्रोच्या अध्यक्षांच्या हस्ते भंडारी हायस्कुलच्या तन्मय परब याचा गौरव…

⚡मालवण ता.२१-:
इस्कॉन संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मूल्य शिक्षण स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या आणि इस्रो बेंगलोर भेटीसाठी निवड झालेल्या मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय महेश परब याचा बेंगलोर येथे इस्रोचे चेअरमन श्री. सोमनाथ यांच्या हस्ते गोल्ड मेडल प्रदान करून गौरव करण्यात आला.

इस्कॉन या संस्थेनेमार्फत भगवद्गीता व तिचा जीवनातील उपयोग या विषयावर ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली होती. यात भंडारी हायस्कुलमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. यामध्ये तन्मय परब याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावीत सुयश मिळविले होते. या यशामुळे तन्मय याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या बँगलोर भेटीसाठी निवड झाली होती. दि. १२ जून रोजी तन्मय याची इस्रोची सफर पार पडली. त्यावेळी शेषाद्रीपुरम – बेंगलोर येथील भव्य कार्यक्रमात इस्रोचे चेअरमन श्री. सोमनाथ यांच्या हस्ते तन्मय परब याला गोल्ड मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

तन्मय परब याच्या यां यशात भंडारी हायस्कुलचे विज्ञान विषयाचे शिक्षक एस. ए. अवसरे यांचे मार्गदर्शन लाभले होते. तन्मयच्या यशाबद्दल भंडारी एज्यूकेशन सोसायटी (मालवण) मुंबई चे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .

You cannot copy content of this page