केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत प्रेस क्लबचे पत्रकार पुरस्कार वितरण

जय भोसले, विश्वनाथ नाईक,दिव्या वायंगणकर,प्रकाश वालावलकर यांचा सन्मान;लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी समाजाला दिशा देण्याचे नाईक यांनी केले आवाहन

सावंतवाडी,ता.१२: सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांचे वितरण आज केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शहरी विभाग पुरस्कार बांदा येथील पत्रकार जय भोसले यांना तर ग्रामीण विभाग पुरस्कार पाडलोस येथील पत्रकार विश्वनाथ नाईक यांना प्रदान करण्यात आला.कै.संदीप सावंत स्मृती पुरस्कार दिव्या वायंगणकर यांना तर सिंधुदुर्ग प्रेस क्लब पुरस्कार मडूरा येथील प्रसिद्ध शेतकरी बागायतदार प्रकाश वालावलकर यांना प्रदान करून गौरविण्यात आले.

माडखोल येथील सावंत फार्म येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. दरम्यान पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करावे,असे आवाहन केंद्रीय मंत्री श्री नाईक यांनी यावेळी केले.

यावेळी पद्मश्री विजेते परशुराम गंगावणे,भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,प्रांताधिकारी प्रशांत पनवेलकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे,पोलीस निरीक्षक शंकर कोरे,राजेंद्र मसुरकर,देवा टेमकर संतोष जोईल,राजू तावडे,रवी जाधव ,अभिमन्यू लोंढे,विजय देसाई,अमोल टेंबकर,हरिश्चंद्र पवार,गोपाळ धाऊसकर,जान्हवी भोसले,माजी सभापती प्रमोद सावंत,प्रेस क्लब अध्यक्ष उत्तम वाडकर,सूत्रसंचालक गौरवी पेडणेकर, राकेश परब,निलेश मोरजकर,नाथा कदम,अनंत जाधव, रुपेश हिराप,हेमंत खानोलकर,प्रवीण परब,विराज परब,संदेश पाटील,शैलेश मयेकर, रणजित जाधव,संदेश कारीवडेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page