*⚡मालवण ता.१२-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी विभागामार्फत विश्व हिंदी दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित हिंदी काव्य आस्वाद समारोह या कार्यक्रमात प्रमुख अतिथी युवा हिंदी कवी राणा रामशंकर कुमार यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर आपले विचार मांडत हिंदी भाषेचे महत्वही विशद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत उपस्थित होत्या.यावेळी हिंदी विभागप्रमुख हंबीरराव चौगुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. सामंत यांनी कुमार यांचे स्वागत केले. कुमार यांनी विविध विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. यात ‘कोरोना, समाधान, बारी, राजनीती, जो दिखे साफ वो साफ, होना जरूरी नही, मेरा प्यार, आँधियो के जोड में, गलवान घाटी और राष्ट्रवाद या कविता सादर केल्या. हिंदी भाषेचे महत्व त्यांनी विशद केले. आभार प्रा. अन्वेषा कदम यांनी मानले. या ऑनलाईन कविता आस्वाद कार्यक्रमामध्ये डॉ. डी. व्ही. हारगिरे, प्रा. संकेत बेळेकर, प्रा. प्रमोद खरात, डॉ. एम. आर. खोत, प्रा. सौ. बर्वे, प्रा. के. के. राबते व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
